बिनधास्त बोलायचं!
कधी आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना का घाबरतो ? विशेषतः जेव्हा तो ग्राहक, वरिष्ठ अधिकारी किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती असते?
मनात नेहमीच एक विचार येतो तो म्हणजे “काय वाटेल त्यांना माझ्याबद्दल?”
पण खरं सांगायच तर, घाबरून बसलो तर काय होणार?
ती भीती आपल्याला वाढायला मदत करतेय का? नाही ना! मग का तिच्या मागे वेळ वाया घालवायचा?
कशाला घाबरायचं?
बिनधास्त बोलायचं!
कारण जेव्हा आपण बोलतो, तेव्हाच समोरच्याला काय वाटतंय हे समजतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जे चांगलं करायचं आहे आणि ज्याची भीती वाटते, तेच सर्वात आधी करायचं.
प्रत्येक संवाद हा शिकण्याची आणि वाढीची संधी असते.
बोला, अनुभव घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
#आत्मविश्वास #भीतीवरमात #स्वविकास #प्रेरणा #संवादकौशल्य #Mindset #MotivationMarathi #Confidence #PositiveVibes #CareerGrowth #HappyLearning #MarathiBlog #PersonalGrowth #Fearless#mindfulmanass
Comments
Post a Comment