Posts

आपण पैसा कमावत आहोत, की पैशासाठी जगत आहोत?

Image
आपण पैसा कमावत आहोत, की पैशासाठी जगत आहोत? आज सकाळी अशीच सहज खिडकीबाहेर पाहत बसले असताना मनात एक विचार आला... आणि डायरीचं पान कधी भरलं कळलंच नाही. कधी कधी मनातली घालमेल शब्दांत उतरली की स्वतःकडेच नव्या नजरेने पाहायला शिकवते. तो एक दिवसाचा 'रेड अलर्ट' आणि घरची परिस्थिती सोमवारी शहरात रेड अलर्ट घोषित झाला होता. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मी ऑफिसला सुट्टी घेतली. पण निसर्गाचा खेळ बघा, आमच्या घरात किंवा ऑफिसच्या भागात कुठेही पाणी साठलं नव्हतं. सगळं काही नेहमीप्रमाणे सुरळीत होतं. हे जेव्हा आईला समजले, तेव्हा ती माझ्यावर रुसली. तिने माझ्याशी बोलणंही टाळलं. त्या क्षणी मनाला खूप लागलं. मनात एकच प्रश्न घोळत राहिला. "माझ्या एका दिवसाच्या पगारापेक्षा माझी किंमत खरोखरच कमी आहे का? माझी सुरक्षितता जास्त महत्त्वाची नाही का?" राग, दुःख आणि गोंधळ. सगळंच एकाच वेळी मनात दाटून आलं. राग शांत झाला आणि वास्तव समोर आलं. थोडा वेळ गेला. राग ओसरला आणि शांतपणे विचार केला. तेव्हा जाणवलं. दोष आईचा नव्हता. तिला परिस्थितीने आणि आयुष्यातील जबाबदाऱ्यांनी तसं विचार करायला भाग पाडलं आहे. मध्यमवर्गीय कुटुं...

Skills म्हणजे काय?

Skills म्हणजे काय? यशासाठी कौशल्य का महत्त्वाचं आहे? आज प्रत्येक ठिकाणी एकच शब्द ऐकू येतो skills. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा वैयक्तिक आयुष्य, skills नसतील तर पुढे जाणं कठीण होतं. पण skills म्हणजे नेमकं काय? फक्त माहिती असणं म्हणजे skill आहे का? नाही. Skills म्हणजे नक्की काय? Skills म्हणजे एखादं काम समजून, योग्य पद्धतीने आणि आत्मविश्वासाने करण्याची क्षमता. पुस्तकातलं ज्ञान माहिती देतं, पण त्या माहितीचा वापर करून कृती करता येणं ही खरी skill आहे. उदाहरणार्थ, बोलता येणं ही skill नाही, पण समोरच्या व्यक्तीशी शांतपणे, स्पष्टपणे संवाद साधता येणं ही skill आहे. Skills जन्मजात असतात का? काही skills आपल्यामध्ये नैसर्गिकरित्या असतात. कोणी चांगलं ऐकू शकतं, कोणी पटकन निरीक्षण करतं, तर कोणी समस्या सोडवण्यात पुढे असतं. पण याचा अर्थ असा नाही की ज्या skills जन्मजात नाहीत त्या शिकता येत नाहीत. बहुतेक skills शिकता येतात, फक्त वेळ आणि प्रयत्न लागतात. मग सगळ्यांना skills का जमत नाहीत? कारण skill शिकण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नसते, ती वापरण्याची तयारी लागते. आपल्याला अनेकदा कळतं की “हे मला शिकायला हवं”, पण ...

अस्पष्टतेतून स्पष्टतेकडे: मनाचे मार्गदर्शन

कधी असं वाटतं का की बाहेरून सर्व काही ठिक आहे, तरीही मनात एक हलकासा गोंधळ राहतो? विचार आहेत. माहिती आहे. पण स्पष्टता नाही. छातीत जडपणा, निर्णय घेण्याची गरज, पण आतल्या शंकेची होणारी चपळ हालचाल. थोडं कळलेलं असतं, पण ते पुरेसं नसतं. ही अस्वस्थता बहुतेक वेळा अपयशातून येत नाही. ती येते अर्धवट समजुतीतून. अर्धवट समजूत खूप धोकादायक असते, कारण ती स्वतःला पूर्ण समजते. आपण थोडंसं शिकतो, आणि मन लगेच निष्कर्षांवर पोहोचतं. प्रश्न विचारणं थांबतं. विचार खोल जात नाहीत. आणि आत कुठेतरी गोंधळ वाढतो. Self-doubt नेहमी क्षमतेअभावी नसतो; तो अनेकदा अस्पष्टतेमुळे जन्म घेतो. मन गढूळ असलं की स्वतःवर विश्वास ठेवणं कठीण होतं. निर्णय पुढे ढकलला जातो, कधी स्वतःलाच दोष दिला जातो. हळू विचार करणं कमजोरी नाही. ती एक शिस्त आहे. सगळं लगेच समजायलाच हवं असा हट्ट सुटला, की मन शांत होतं. विचार स्थिर होतात. अभ्यास म्हणजे वेग नाही. तो समजून घेण्याची प्रक्रिया आहे. आज मला हे स्पष्ट कळलं, माझा self-doubt माझ्या असमर्थतेमुळे नव्हता, तो घाईमुळे होता. म्हणून आता ठरवलं आहे , कमी ज्ञान, पण खोल समज. अंदाज नाही, फक्त स्पष्टता. कारण वाढ ज...

भटकणारं मन थांबतं तेव्हा: मानसीचा अनुभव

 कधी कधी जीवन आपल्याला शांतपणे एक शिकवण देतं. मानसीलाही अशीच एक जाणीव झाली. ती घरी असली की सतत काही ना काही करत राहत होती. घरकाम, जबाबदाऱ्या, छोट्या-छोट्या गोष्टींनी तयार होणारा ताण आणि त्यात अभ्यासाचा प्रयत्न.  अशातच एक दिवस तिने संदीप माहेश्वरी यांचा व्हिडीओ पाहिला. त्यातील एक वाक्य थेट तिच्या मनात कोरलं गेलं: “आपलं अटेंशन नियंत्रित करा आणि ते एका गोष्टीवर टिकवा.” त्या एका ओळीनं तिच्या विचारांना दिशा दिली. तिला जाणवलं की लक्ष टिकवणं ही आजच्या पिढीची सर्वात मोठी कमतरता बनली आहे. आणि तेच कौशल्य मिळवलं तर अर्धा प्रवास जिंकला जातो. मानसीनं ठरवलं की आता बहाण्यांना विश्रांती. ऑफिसहून थकून आल्यावरसुद्धा अभ्यास होऊ शकतो, इच्छाशक्ती मजबूत झाली की. ती स्वतःबद्दल नव्याने जाणू लागली. “मी करायचं ठरवलं तर मी नक्की करू शकते.” हा आत्मविश्वास तिच्यात शांतपणे वाढत राहत आहे. राईट स्किल्स, FOMO आणि आजची धावपळ – मनाला खरी गरज कोणती? आज जग वेगाने पुढे जातंय. सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द: “राईट स्किल्स.” हे महत्वाचं आहे हे मानसीलाही कळतं. पण या स्किल्सच्या मागे धावताना अनेक विद्यार्थी स्व...

स्वतःकडे परत जाण्याची सुरुवात

 अनुष्का नेहमी स्वतःकडे शांतपणे पाहणारी मुलगी आहे. पण गेल्या काही दिवसांत तिने स्वतःबद्दल काही अशा गोष्टी शोधल्या, ज्या तिला आधी कधी जाणवल्याच नव्हत्या. हा प्रवास अचानक सुरू झाला आणि तिला स्वतःबद्दल खोलवर समजायला मदत करू लागला. काल अनुष्काने एक YouTube व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये एक साधा सल्ला दिला होता की राग आला, तणाव आला किंवा मन त्रासले तरी शांत आणि नम्रपणे बोलावं. तिने हे प्रत्यक्षात करून पाहिलं आणि ती आश्चर्यचकित झाली.आपल्या नकळत ती कधी कधी थोडी कडक बोलत होती. तिचा हेतू तसा नव्हता, पण आवाजाचा टोन तसाच वाटत होता. ही जाणीव तिच्या मनात खोलवर गेली आणि ती अधिक सजग झाली. तिने स्वतःला अजून एका गोष्टीत ओळखलं. घराबाहेर पडली की तिचा ताण जणू वाऱ्यासोबत दूर उडून जातो. चालताना तिच्या मनात शांतता पसरते. विचारांची गर्दी विखुरते, आणि तिला स्वतःची उपस्थिती अगदी स्पष्ट जाणवते. हा छोटासा बदल तिच्यासाठी मानसिक विश्रांतीसारखा झाला. कधी कधी बाहेरचं वातावरण मनाला किती शांत करतं हे तिला आता नीट कळायला लागलं. आज तिला तिच्या स्वभावातील आणखी एक बाजू कळली. कुणी तिला अचानक प्रश्न विचारला की ती थोडी...

बिनधास्त बोलायचं!

 कधी आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना का घाबरतो ? विशेषतः जेव्हा तो ग्राहक, वरिष्ठ अधिकारी किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती असते? मनात नेहमीच एक विचार येतो तो म्हणजे “काय वाटेल त्यांना माझ्याबद्दल?” पण खरं सांगायच तर, घाबरून बसलो तर काय होणार? ती भीती आपल्याला वाढायला मदत करतेय का? नाही ना! मग का तिच्या मागे वेळ वाया घालवायचा? कशाला घाबरायचं? बिनधास्त बोलायचं! कारण जेव्हा आपण बोलतो, तेव्हाच समोरच्याला काय वाटतंय हे समजतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चांगलं करायचं आहे आणि ज्याची भीती वाटते, तेच सर्वात आधी करायचं.  प्रत्येक संवाद हा शिकण्याची आणि वाढीची संधी असते. बोला, अनुभव घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. #आत्मविश्वास #भीतीवरमात #स्वविकास #प्रेरणा #संवादकौशल्य #Mindset #MotivationMarathi #Confidence #PositiveVibes #CareerGrowth #HappyLearning #MarathiBlog #PersonalGrowth #Fearless#mindfulmanass

भावनांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना समजून घ्या!

कधीतरी एका क्षणात मन आनंदाच्या शिखरावर पोहोचतं, तर दुसऱ्याच क्षणी दुःखाच्या खोल दरीत हरवून जातं. राग आणि भीती यांसारख्या भावना आपल्याला इतकं गोंधळात टाकतात की आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम होतो. जरा विचार करा, जर आपण या भावनांना वाट मोकळी करून दिली नाही, तर काय होईल? जसा एखादा बांध फुटल्यावर सगळं काही उद्ध्वस्त होतं, त्याचप्रमाणे आपल्या मनात साठलेल्या नकारात्मक भावनांचा स्फोट आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो! म्हणूनच, या भावनांना ओळखणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांना योग्य प्रकारे व्यक्त करणं हे आपल्या आनंदी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भावना व्यवस्थापन म्हणजे दुसरं काही नसून स्वतःच्या अंतरंगात डोकावून आपल्या भावनांची जाणीव करून घेणं. जेव्हा आपण आपल्या भावनांना जशा आहेत तशा स्वीकारतो, तेव्हा आपल्या मनावरचा एक मोठा भार आपोआप उतरतो. अस्थिर झालेल्या मनाला शांत करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं. कितीही नकारात्मकता असली तरी, जगात प्रत्येक गोष्टीत काहीतरी सकारात्मक नक्कीच दडलेलं असतं; फक्त आपल्याला ते शोधण्याची आणि त्या...