भीतीला मैत्रीचा हात.

कधी कधी ना, आपल्याला एखादी गोष्ट अगदी मनापासून आवडते.ती गोष्ट करायला मन आतून ओढ घेतं, एक वेगळीच नैसर्गिक प्रेरणा मिळते. पण तरीही, आपण घाबरतो... असं का होतं आणि आपण नक्की कशाला घाबरतो ?


हे घाबरणं अगदी स्वभाविक आहे. हे अगदी तसंच आहे, जसं एखाद्या लहान मुल पहिल्यांदा शाळेत जाताना घाबरते. ही जी भीती आपल्याला वारंवार सांगत असते की आपण आपल्या comfort zone च्या बाहेर पडत आहोत नवीन गोष्टी करत असताना थोडी भीती वाटणं तर स्वाभाविक आहे पण एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे ती भीती आपल्या प्रगतीमध्ये अडथळा बनू नये.


आपल्या आतमध्ये असलेल्या भीतीला मित्र बनवलं तर? या भीती नावाच्या भावनेवर नियंत्रण ठेवलं तर? भीतीला आव्हान देऊन तिला सांगितलं की मी तुला हरवणार नाही, पण तुझ्यासोबत चालणार आहे तर नक्कीच योग्य तो बदल घडू शकतो.

 

स्वतःला शोधण्याची नामी संधी म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी. त्या गोष्टी करताना आपल्याला समजतं की आपण नक्की कोण आहोत आपल्यामध्ये नक्की काय क्षमता आहेत त्यातून आपण आपल्या जीवनाचा खरा उद्देश्य शोधू शकतो.


आपल्या आवडीच्या गोष्टींना दुर्लक्षित करणं म्हणजे आपल्या आतल्या आवाजाला दाबून टाकणं. पण म्हणतात ना जिथे आवड असते तिथे सवड ही मिळतेच रोजच्या कामात, जबाबदाऱ्यांमध्ये, ताण-तणावांमध्ये थोडा वेळ आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी काढला, तर मन शांत होतं. नवीन गोष्टी शिकायला मिळतात, काहीतरी नवीन करायला मिळतं.                         


आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं. त्यामुळे, थोडा वेळ काढा आणि स्वतःला आनंदी ठेवा. कारण, शेवटी, आपण आनंदी असलो, तरच जगणं सुंदर वाटतं, नाही का?"


#MindfulManass #Fearless #Self-improvement #Motivation 



 

Comments

Popular posts from this blog

बदल करणं खरंच कठीण आहे का?

आत्मसन्मान

माझ्यातील मी: स्वीकार आणि विकास