आत्मसन्मान
हे मात्र अगदी खरं आहे की, माणूस अगदी कसाही असला तरी, त्याच्या मनात स्वतःबद्दल एक आदर हा असतोच. तो म्हणजे आत्मसन्मान होय. आत्मसन्मान जगायला नवीन बळ देते. ज्या व्यक्तीला स्वतःच्या आत्मसन्मानाची किंमत कळते, ती व्यक्ती अडचणींच्या वेळी खंबीरपणे उभी राहते आणि विचारपूर्वक मार्ग काढते.म्हणूनच, स्वतःला ओळखणं खुपचं महत्त्वाचं आहे.
स्वतःला ओळखणं म्हणजे नक्की काय बरं ? हा प्रश्न अनेकांना पडतो ?
आपल्या चांगल्या-वाईट बाजू समजून घेतल्यावरच आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजु शकतो, स्वीकारू शकतो. स्वतःवर टीका करा,स्वतःवर टीका करणही तितकचं गरजेचं आहे, कारण त्यातुन सकारात्मक परिणाम घडतात.काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आपली प्रगती होते. जर नकारात्मक बोलण्यामुळे आपलं मन उदास होत असेल, खचुन जात असेल, तर लगेच तसं करणं टाळायला हवं. हळुहळु स्वतःला तयार करून मग त्या टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करायला हवा.
आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कमजोरीला कधीच दुसऱ्याची ताकद बनवून द्यायची नाही.
उदाहरणार्थ ,जर मला सार्वजनिक भाषणाची भीती वाटत असेल, तर मी ती भीती दूर करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, आणि त्या भीतीचा इतरांना फायदा घेऊ देणार नाही. आपण स्वतःहून स्वतःची काळजी घ्यायला शिकायला हवं आणि आपल्या आत्मसन्मानाचं नेहमी रक्षण करायला हवं. कारण तोच आपल्याला खऱ्या अर्थाने मजबूत बनवतो!
#MindfulManass #SelfRespect #Self-improvement #Motivation
I agree, I believe it's very difficult to start something which is not comforting for us. With time, it does get easier. But, It needs time and patience.
ReplyDelete