बदल करणं खरंच कठीण आहे का?
बदल करणं खरंच कठीण आहे का? आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत इतके रमून जातो, इतके हरवून जातो , सगळं इतक सवयीचं होऊन जातं की काही नवीन करायचं म्हटलं की मात्र आपल्याला धडकीच भरते मनामध्ये एक वेगळीच भावना दाटून येते एक अनामिक भीतीशी वाटू लागते की "आता हे कसं होणार" ? "मला जमेल का"? जे चालू आहे ते चांगलंच आहे असे कितीतरी विचार मनामध्ये काहूर माजवतात. मला आठवतं, माझी एक मैत्रीण एकाच बँकेत वर्षानुवर्षे काम करत असल्याने तिला सगळं तोंडपाठ झालं होतं.अचानक बँकेने नवीन सॉफ्टवेअर आणलं, आणि तिला ते शिकायला थोडा वेळ लागत असल्याने तिला खूप भीती वाटत होती. 'आपल्याला आता हे जमेल का ?', 'आपण मागे पडू का?' असे विचार तिला सतावत होते. पण तिने धीर धरला, थोडा वेळ काढला, आणि हळूहळू ती नवीन गोष्टी शिकली. आज ती त्या सॉफ्टवेअरमध्ये एकदम एक्स्पर्ट आहे. असं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात होतं. आपण कुठल्यातरी एका चौकटीत अडकून पडतो, आणि त्या चौकटीबाहेर पडायला घाबरतो. पण खरं सांगायचं तर, त्या चौकटीबाहेरच आपली खरी प्रगती दडलेली असते. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. मग...